रत्नागिरी:- शहरातील छत्रपतीनगर नाचणे, येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरटयाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. ८) सकाळी पावणे आठ ते सव्वा नऊच्या सुमारास छत्रपतीनगर, नाचणे येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय रमेश पावसकर (वय ५५, रा. ७०७ ई छत्रपतीनगर, नाचणे, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र.एमएच-०४ केई ७२०८) ही त्यांनी त्याच्या राहत्या घराच्या समोर उभी केली होती. चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी संजय पावसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.