चोरीतील संशयितांना अंतरीम अटकपूर्व जामीन

खेड:- हॅथवे केबल नेटवर्कची २०० मीटर केबल व एफटीबी बॉक्सची चोरी केल्या प्रकरणातील दोन्ही संशयितांचा येथील न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज काही अटी व शर्तीवर मंजूर केला.

याबाबत खेड पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आसिफ इब्राहीम पटेल व समीर सखाराम सकपाळ (सर्व रा. खेड) यांनी हॅथवे केबल नेटवर्क यांच्या मालकीची २०० मीटर केबल व एफटीबी बॉक्सची चोरी केली होती. त्यामुळे संशयितावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. स्वरूप थरवळ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.