चुलीवर तोल जाऊन भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू

रत्नागिरी:- चुलीवर पाणी तापवत असताना तोल जाऊन पडलेली महिला ८२ टक्के भाजली उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

फरजाना अब्दुललतीफ तांडेल (वय ४८, रा. गोळप मोहल्ला, पावस, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरजाना ही सकाळी सहाच्या सुमारास उठून चुलीवर पाणी तापवत होती. चूल पेटवून पाणी तापवत असताना तिचा तोल गेला आणि ती चुलीवर पडली. त्यामध्ये तिच्या नायलॉनच्या साडीने पेट घेतला त्यात ती ८२ टक्के भाजली. तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.