रत्नागिरी:- चार वर्षीय चिमुरडीचा विनयभंग करणार्या बंधिस्त विभागात काम केलेल्या एका ६७ वर्षीय सेवा निवृत्त कर्मचार्याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपुर्वी हि घटना घडली होती.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात एका ६७ वर्षीय बंधिस्त विभागात काम केलेल्या सेवा निवृत्त कर्मचार्याने चार वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुढे आला होता. चिमुडीच्या नातेवाईकांच्या हि गंभीर गोष्ट लक्षात येताच त्यांनी संबधीत सेवा निवृत्त कर्मचार्याच्या विरोधात विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी संबधित गंभीर प्रकाराची चौकशी केल्यानंतर शनिवारी त्या कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे.
६७ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचार्याने घृणास्पद प्रकार केल्याने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. संबधित गुन्ह्याची कसून चौकशी करुन कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.