चिपीप्रमाणे रत्नागिरी विमानतळही उड्डानासाठी तयार

उदय सामंत; नाईट लॅंडिंगचा ७० कोटीचा प्रस्ताव सादर

रत्नागिरी:- चिपी (जि. सिंधुदुर्ग) विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळही उड्डानासाठी तयार आहे. मात्र त्याबाबत गैरसमज पसरविली जात आहे. विमान पार्किंगसाठी लागणारी ५० एकर जागा मिळत नव्हती. ती धरम चव्हाण यांची जागा उपलब्ध झाली आहे. भाड्याने ही जागा घेऊन लवकरच पुढील प्रक्रिया केली जाईल. विमानांच्या नाईट लॅंडिगसाठीही ७० कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चिपी विमानळाचे काम ज्या कंपनीने केले आहे. त्याच कंपनीने रत्नागिरी विमानतळाचे काम केले आहे. विमान पार्किंगासाठी ५० एकर जागा लागणार होती. मात्र ती जागाच मिळत नव्हती. धरम चव्हाण यांनी ५० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. विमान पार्किंसगसाठी तुम्हीच ही जागा विकसीत करून भाड्याने द्या, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. शासनाच आता ही जागा विकसीत करून तेथे विमान पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी चव्हाण यांना योग्य ते भाडे दिले जाणार आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. पहिली ११०० मिटरची धावपट्टी आता २ किमी करण्यात आली आहे. धावपट्टीची उंची देखील वाढविण्यात आली आहे.  चार्टर फ्लाईट उतरविण्याची परवानगी मिळावीयासाठी डोमेस्टिक महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली आहे.