चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील वहाळ येथून मुर्तवडे या ठिकाणी जाणार्या एका दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी स. 11 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय वसंत पांचाळ (रा. मूर्तवडे, सुतारवाडी, चिपळूण) हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन वहाळ ते मुर्तवडे असा प्रवास करत होता. त्याच्या मागील सीटवर दिलीप पांचाळ (52, मूर्तवडे, सुतारवाडी, चिपळूण) हे बसले होते. यावेळी वारेली निवाचा आडवा या ठिकाणी आले असता संजय याने अचानक ब्रेक लावला. यामध्ये त्याला किरकोळ दुखापत झाली तर मागील सीटवर बसलेल्या दिलीप पांचाळ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची फिर्याद राजेंद्र पांचाळ (38, मुर्तवडे) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार दुचाकीस्वार संतय वसंत पांचाळ याच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









