चिपळूण येथे घर फोडून 68 हजारांचे दागिने लंपास

चिपळूण:- चिपळूण येथे घराच्या कपाटातील लॉकरमधून 68 हजाराचे दागिने चोरल्याची घटना शहरातील शिवाजीनगर येथील घडली. शिवालय अपार्टमेंटमध्ये गेल्या आठवड्यात ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी कल्याण दत्तात्रय काटदरे (27, शिवालय अपार्टमेंट, शिवाजीनगर, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद चित्रा वैभव वायळ (37, शिवाजीनगर-शिवालय अपार्टमेंट) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शिवाजीनगर येथील शिवालय अपार्टमेंटमध्ये 10 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास काटदरे याने वायळ यांच्या घरातील कपाटातील लॉकरमधून कपाटात असलेल्या चावीचा वापर करत 68 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. यापकरणी वायळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काटदरे याच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.