चिपळूणात 99 हजाराची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्याचा फटका बँक खातेदाराला बसला आहे. लिंक वर आलेली माहिती भरली आणि त्यांनतर आलेल्या ओटीपीची माहिती दिल्यानंतर बँक खातेदाराच्या खात्यातून 99 हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना सावर्डे परिसरात घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.

इलेक्ट्रीसिटी बिल अपडेट करण्यासाठी अज्ञाताने लिंक पाठवली. ही लिंक ओपन करुन त्यावर बँक खातेदाराने माहिती भरल्यानंतर आलेला ओ.टी.पी. नंबर अज्ञाताला सांगितला. यातूनच त्या बँक खातेदाराच्या खात्यातून एकदा 50 हजार व दुसऱ्यावेळी 49 हजार रूपये असे एकूण 99 हजार रुपये यूपीआयव्दारे ट्रान्स्फर करुन बँक खात्यातून ऑनलाईन काढल्याची घटना घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.