चिपळूण:- तालुक्यातील कुडप मोकासवाडी येथील श्री कालिका देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी सत्यवान सुनील पांचाळ (२४, रा. येगाव) या तरुणाला अटक केली आहे. त्याने मंदिरातील दानपेटी फोडून ६८० रूपयांची रक्कम चोरली होती.
या बाबत अमर रवींद्र राजेशिर्के यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ही घटना ४ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री कालिका देवीच्या मंदिरात घडली होती.