चिपळूणात मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली

चिपळूण:- तालुक्यातील दहीवली खुर्द येथील श्री आई वरदान मानाई देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून ७ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील दहिवली खुर्द येथे श्री आई वरदान मानाई देवीचे मंदिर आहे. फेब्रुवारी ते मार्च या २ महिन्याच्या कालावधीत चोरट्याने या मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरे तोडून त्याचे नुकसान केले. त्यानंतर दानपेटी उचकटून त्यातील ७ हजार रुपयांची रक्कम चोरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बाबत सावर्डे पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.