चिपळूणात भरदिवसा बंद घर फोडून चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथे घरफोडी झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद समीर अलि चिकटे (45, रा. कळंबस्ते मोहल्ला, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.

मुलांना नाताळची सुट्टी असल्याने समीर चिकटे हे कुटुंबासह रत्नागिरी येथे आले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञाताने दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराच्या कपाटीमध्ये डब्यात व पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरुन नेली.  याबाबतची फिर्याद समीर चिकटे यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल  केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.