चिपळूणात पाईपची चोरी करणाऱ्या विरोधात गुन्हा

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी- मंदिर परिसरात दत्तवाडी येथून ६ हजार ७७२ रुपये किंमतीचे पाईप चोरी केल्याची घटना गेल्या जानेवारी महिन्यात घडली होती. या प्रकरणी चोरट्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन चिले (पूर्ण नाव, गाव माहिती नाही) असे गुन्हा झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद मिलिंद भैरुमल ओसवाल (४२, बाजारपेठ, चिपळूण) यांनी दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २६ ते २९ जानेवारी या दरम्यान ओसवाल यांनी दत्तवाडी येथील जमिनीत जीवन चिले याने पक्का दगडी सिमेंट बांध तोडून ६ हजार ७७२ रुपये किंमतीचे २० फूट व गोलाई २ इंच असे ५ गॅलोनाईज लोखंडी पाईप चोरून नेले. हा प्रकार ओसवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चिले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.