चिपळूण:- चिपळूण -गुहागर मार्गावर मिरजोळी साईमंदिर परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या दुचाकी अपघातात खोपड येथील 25 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
हा तरूण खोपडकडून चिपळूणकडे आपल्या केटीएम दुचाकीने येत असताना एका तपरीच्या सिमेंट खांबावर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला एका रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अन्य ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला कराड येथे नेण्यात आले आहे.