चिपळुणात वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- अज्ञात व्यक्तीने मित्राचा आवाज काढून वैद्यकीय उपचारासाठी मदत मागत सेवानिवृत्त वृद्धाची १ लाख १५ हजारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अरुण पुरुषोत्तम बापट (६८, मूळ-पुणे, सध्या-चिपळूण) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अरुण बापट यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्या अज्ञात व्यक्तीने मित्राच्या आवाजात वैद्यकीय उपचारासाठी मदत मागत बापट यांची १ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.