चिपळूण:- रेल्वेगाडीर्ची धडके बसून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावर्डे रेल्वेस्थानक परिसरात बुधवारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कालू लाल गुजर (३८, माडलगठ, दिलवाड-राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबई ते रत्नागिरी मार्गावरील मालवाहू रेल्वेगाडीची धडक कालू गुजर याला बसली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यातच त्याचा मृत्यू झाला.