चिपळूण:- पिंपळी-खुर्द येथे गुरुवारी सकाळी 10.30 ते सांयकाळी 6.30 वाजण्याच्या मुदतीत घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष शंकर रिळकर (53) यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यांचे पिंपळी खुर्द येथे घर आहे. चोरटयाने लोखंडी पहार व कोयतीच्या सहाय्याने पाठीमागील लोखंडी दरवाजाची जाळी कापत दरवाजा उघडला. त्यानंतर लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. देवघरात असलेली लोखंडी कपाटातील एक सोन्याची चेन, 35 ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र, 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार व 38 हजार रुपयांची रोकड असा 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती अन्य नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोऱ्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.