चिपळूण:- भरधाव वेगातील दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याची घटना मंगळवारी खांडोत्री येथे घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय शैलेश पटेल (गुहागर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद औदुत सोमा भागडे (३१, आंबिटगाव) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औदुत भागडे हे त्याच्या ताब्यातील टेम्पो पाते पिलवली ते आंबीटगाव
अशी चालवत होते. असे असताना ते खांडोत्री येथील गांगण यांच्या पोल्ट्रीजवळील वळणावर आल्यावेळी समोरून दुचाकीवरील चालक उदय पटेल याने रस्ता वळणाचा असतानाही भरधाव वेगाने दुचाकी चालवून चुकीच्या दिशेला उजव्या बाजूला येऊन औदुत भागडे यांच्या टेम्पोला धडक दिली. यात उदय पटेल हा जखमी झाला. या अपघातप्रकरणी त्याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









