चिपळुणात गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

चिपळूण:- गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना ५ मे रोजी सायंकाळी १६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा अबुबा दराडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश प्रकाश कदम (वय ३४, रा. मिरजोळी बौध्दवाडी, ता. चिपळूण) हा गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे बसून बेकायदेशीररित्या गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळून आला.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.स