चिपळुणात क्षुल्लक कारणातून मारहाण

चिपळूण:- क्षुल्लके कारणातून झालेल्या वादामुळे एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कुडप-शिर्केवाडी येथे सोमवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश सुरेश राजेशिर्के, परेश सुरेश राजेशिर्के (कुडप-शिर्केवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची फिर्याद कमलेश उत्तमराव गायकवाड (३२, पाचांबे) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश गायकवाड हे त्यांच्या कुडप-शिर्केवाडी येथे आत्याच्या घरी जेवायला गेले होते. तेव्हा रात्री ८.३० च्या सुमारास कमलेश यांची वहिनी प्राची परेश राजेशिर्के ही जेवण घेऊन आली असता कमलेशने ‘मला उशिरा जेवण घेऊन का आलीस’ असे म्हणत तिला बडबडले. यावरुन नरेश राजेशिर्के, परेश राजेशिर्के याने कमलेश याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली.