चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून टेरव येथील तरुण ठार झाला. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सिद्धेश दिलीप गोवळकर (22, टेरव-तांबडवाडी) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद ट्रकचालक बसप्पा भिपाप्पा पुदरीमणी (बेळगाव) यांनी दिली. ते आपल्या ताब्यातील ट्रक कापसाळ येथे रस्त्याया कडेला उभा करून झोपले होते. रात्री 12.30 वाजता पाठीमागे काहीतरी आपटल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. यावेळी सिद्धेश याची दुचाकी आदळल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अपघातात सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला.