Sunday, July 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने वार करून खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने वार करून खून

पतीवर गुन्हा दाखल

मंडणगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोंडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याचा संशय घेऊन पतीने आपल्या २२ वर्षीय पत्नीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश निलेश पवार (वय २५, रा. कोंडगाव) याने आपली पत्नी वैशाली मंगेश पवार (वय २२) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेतला होता. याच कारणावरून ६ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, जेव्हा वैशाली घराच्या समोर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसलेली होती, तेव्हा आरोपी मंगेशने धारदार कोयत्याने तिच्या डोक्यावर वार केले. या भीषण हल्ल्यात वैशालीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी रामभाऊ सखाराम पवार (वय ६५) यांनी मंडणगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०३ (१) (कलम ३०२) अन्वये आरोपी मंगेश पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.