रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई परिसरात विना परवाना मद्यप्राशन करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.सुमारास करण्यात आली.
सुरेल संजय पवार (36,रा.हरचेरी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित हा चांदेराई ते फणसस्टॉप जाणाया रस्त्यालगत काजळी नदीच्या बाजुला झुडपाचे आडोशाला जमिनीवर बसून विना परवाना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.