चर्मालय येथील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धाड

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय चौक येथे बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

ऋतिक दीपक रहाटे (23,रा.पोमेंडी बु, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी ऋतिक रहाटे हा चर्मालय चौक येथील एका टपरीच्या आडोशाला जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.