रत्नागिरी:-तालुक्यातील चरवेली येथे पदाचा गैरवापर करत 52 खातेदारांची लाखोंची फसवणूक करणार्या डाकसेवकाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
सचिन शशिकांत पवार (रा. चरवेली, रत्नागिरी ) असे त्या डाकसेवकाचे नाव आहे.त्याच्या विरोधात गणपत सीताराम राणे (57,रा.लांजा, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चरवेली येथील डाकघर शाखेत डाक सेवक असलेल्या सचिन पवारने आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने चरवेली परिसरातील 52 खातेदारांकडून 25 लाख 13 हजार 213 रुपये घेऊन ते खातेदारांच्या खात्यात न भरता अपहार करत फसवणूक केली होती.