रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर -चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहिम आदम कोतवाल (५१, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंपक मैदान येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विदेशी मद्यपान करत असताना व दारु स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रोशन सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









