रत्नागिरी:- शहराजवळील चंपक मैदानात झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास येत्या आठ दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.
चंपक मैदानातील अत्याचार प्रकरणाविषयी ते म्हणाले, पिडित तरुणीची मानसिकता, आई-वडिलांना हवा असलेला वेळ तसेच त्यांना भेटून माहिती घेणे यासाठी कालावधी लागणार होता. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी वेळ हवा होता. ही घटना गंभीर असल्यामुळे सगळ्या बाजुचा विचार करणे आवश्यक होते. याविषयीचा तपास पूर्ण होत आला असून पोलिस याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहिर करतील असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंपक मैदानावरील त्या अत्याचार प्रकरणाला सुमारे एक महिना होत आला आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर रत्नागिरी तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांनी पिडीत मुलीचा जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यासाठीची
मागणी केली होती. त्यानुसार तपास सुरू होता. राज्यभरात होत असलेल्या अत्याचार प्रकरणांमुळे या प्रकाराबाबत लवकरात लवकर उलगडा होणे आवश्यक असल्यांचे नागरिकांचे मत होते.