घुडेवठार येथे किरकोळ कारणातून तिघांना दगडाने मारहाण

रत्नागिरी:- शहरातील घुडे वठार येथे किरकोळ कारणातून तिघांना शिवीगाळ करत काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही धटना मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. सुमारास घडली आहे.
बावा वारंग आणि पिंट्या वारंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधत कुंदन नामदेव घुडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार,मंगळवारी दुपारी 2 वा. सुमारास त्यांचा पाळीव पोपट घरातून उडून गेला. त्याचा शोध धेण्यासाठी कुंदन घुडे यांचा मुलगा साईराज घुडे, त्यांच्याकडे भाड्याने राहणारा नितिन निसाद व शेजारी राहणारा नसीब गोसावी हे तिघेही शेजरी राहणारे अमेय घुडे यांच्या वाड्यात गेले हेाते.
या गोष्टीचा राग आल्याने बावा वारंग व पिंट्या वारंग या दोघांनी त्या तिघांनाही शिवीगाळ करत केली. त्यानंतर पिंट्या वारंगने त्याच्या हातातील काठीने तसेच दगडाने तिघांनाही मारहाण केली.