घाणेखुंट येथे भाडेकरूस धमकी, महिलेवर गुन्हा

खेड:- तालुक्यातील घाणेखुंट-बोरीचामाळ येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या एका भाडेकरूस धमकी देत खोलीचा अनधिकृतरित्या ताबा घेतल्याप्रकरणी एका महिलेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय दादबा आंब्रे (रा. गुणदे-मठवाडी) यांनी तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादीच्या मालकीच्या घाणेखुंट-बोरीचामाळ हॉटेल पॅगोडाच्या मागे वडीलोपार्जित ८ गुंठे असलेल्या चाळीतील खोली नं. ४ ला संशयित महिलेने कुलूप लावून भाडोत्री जयदीप पवार यांना खोलीची मालक मी आहे. मला खोलीचे भाडे द्या, असे सांगत धमकी दिली. भाडेकरू जयदीप पवारनी लावलेल्या कुलूपावर दुसरे कुलूप लावत फिर्यादीच्या खोलीचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.