मंडणगड:- घर बांधणीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार ११ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिगवण खलाटी येथे घडली आहे . निसार अमसाब रमजाने , नसीम हसेनमियाँ ओंबीलकर , शोएब हसेन ओंबीलकर आणि अन्य एक जण अशा एकूण चार जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यानुसार , रविवारी सायंकाळी नसीम ओंबीलकरची पत्नी तो कामावरून घरी का आला नाही , हे पाहण्यासाठी शिगवण खलाटी मोहल्ल्यातून येत होती . त्यावेळी निसार रमजाने याने तिला हाक मारुन तुझा पती कोठे आहे . तुझ्या पतीने माझ्या घराच्या कामासाठी दिलेले पैसे खाल्ले असून कामही पूर्ण केलेले नाही असे म्हणाला . त्यावर फिर्यादीने माझ्या पतीने पैशांएवढे काम केलेले असून तुमच्यात झालेला व्यवहार आपआपसात बघून घ्या , असे बोलली . याचा राग आल्याने निसार रमजानेने तिला शिवीगाळ करत बाजूलाच पडलेल्या काठीने फिर्यादीच्या डोक्यात , मनगटावर , पाठीवर , कंबरेवर मारुन दुखापत केली . दरम्यान , या प्रकरणी निसार रमजाने याने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार , निसार रमजाने रविवारी सायंकाळी घरी जात असताना संशयित नसीम ओंबीलकर , शोएब ओंबीलकर आणि अन्य एकजण त्यांच्या घराजवळ येउन शिवीगाळ करु लागले . त्यावेळी निसार रमजाने यांनी तुम्ही शिवीगाळ करता असे विचारल्यावर हातातील काठीने निसार रमजाने यांना मारहाण केली . या प्रकरणी चारही संशयितांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .