संगमेश्वर:- तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडी येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रवींद्र महादेव गुरव (६८, रा. ब्राह्मणवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान त्यांच्या घरासमोर उभी केलेली ज्युपिटर क्लासिक (पिवळ्या रंगाची) दुचाकी (क्र. MH08A ए २२९४) चोरट्याने चोरून नेली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ३०,००० रु. असून गाडीत आर. सी. बुक व चावीही होती. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास के. आर. सावंत व पो. है. कॉ. एस. एस. जाधव करीत आहेत.









