घरातील अडचणी सोडवतो सांगून साडेसात लाखाची फसवणूक

रत्नागिरी:- माझ्या ओळखीच्या साधू बाबाकडून तुमच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगून ७ लाख ५० हजाराच्या दागिन्यांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष बाबासाहेब सुर्वे (रा. विश्वशांती संकुल, दैवज्ञभवन, अभ्युदयनगर, नाचणे-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २ ऑगस्ट २०२३ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत बिल्व मंगल सोसायटी, उत्कर्षनगर, कुवारबाव येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद शंकर मराठे (वय ४२, रा. बिल्वमंगल सोसायटी, उत्कर्षनगर, कुवारबाव-रत्नागिरी) आणि त्यांची बहिण सौ. प्राची हिला संशयित सुभाष यांनी मी तुमची घरातील अडचणी माझ्या ओळखीचे बाबा आहेत. त्यांच्याकडून दूर करतो मात्र त्यासाठी देवापुढे आकार ठेवण्यासाठी दागिने तुमच्याकडचे दागिने पाहिजेत असे सांगितले. तसेच फिर्यादी आणि त्यांचे बहिणीचे दागिने काम झाल्यानंतर परत आणून देतो असे सांगुन सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केली. या प्रकरणी प्रसाद मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.