घरभाड्याच्या वादातून दुसऱ्या पत्नीचा पतीवर चाकूहल्ला 

रत्नागिरी:- घरभाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने पतीवर हल्ला करीत धारधार सुरीने पतीवर वार केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना शुक्रवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास निवखोल येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समद अलीमिया जयगडकर (वय-४१ रा.निवखोल) हे आपल्या घरी असताना त्यांची दुसरी पत्नी सलवा समद जयगडकर हि शुक्रवारी दुपारी निवखोल येथील पती रहात असलेल्या निवस्थांनी आली.संतप्त झालेल्या सलवा हिने पती समद याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचे वाद विकोपाला जाऊन ती राहत असलेल्या रूमचे भाडे पती समद याने न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन सलवा हिने भाजी कापण्याची सुरी घेऊन समद याच्या डोक्यावर पाठीवर व दोन्ही हातावर वार करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी समद अलीमिया जयगडकर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी सलवा समद जयगडकर हिचे विरोधात भा.द.वी.क ३२४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पो.हे.कॉ. पालांडे करीत करीत आहेत.