रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 02/11/2020 रोजी 12.30 ते 5 वा . चे दरम्याने खेडशी नॅनो सिटी येथे राहणाऱ्या श्रुती लांजेकर यांच्या बंद प्लॅटमधून सुमारे 2 लाख 27 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. 2 नोव्हेंबर रोजी ही चोरी झाली होती. ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने देखील घटनास्थळी भेट देवुन तपासास सुरुवात केली. 3 नोव्हेंबर रोजी संशीयीत आरोपीत निलेश विजय मोहीते (वय 29 वर्षे, रा. नॅनोसिटी खेडशी, ता.रत्नागिरी) या संशयितास रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या बॅगेतुन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे दोन हार, सोन्याची अंगठी, कर्णफुल असा चोरीस गेलेला एकुण 2 लाख 27 हजार रुपयांचा सर्व मुद्देमाल जप्त केला.
निलेश मोहिते याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खेडशी, गयाळवाडी, कापडी इन्क्लेव्ह येथे एक बंद प्लेंट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे. या घटनेमध्ये निर्मला चौगुले यांचे घरातुन सुमारे 58 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी चोरी झाली होती आणि त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील दोन्ही गुन्ह्याचा तपास रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे.