खेड:- तालुक्यातील वेरळ- खडकवाडी येथे चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाख ६० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पवार दिनेश दिलीप (३६, रा. घाटकोपर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २४ ते २५ डिसेंबर या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्याने दरवाजाचे कुलूप कोणत्या तरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले २ लाख रुपये किंमतीची सोन्याची सोनसाखळी, १ लाख रुपयें किंमतीची सोन्याची अंगठी व ६० हजाराची रोकड असा ऐवज चोरट्याने लांबवला. घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.









