रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पलायन केले. शुभदा शशिकांत कामतेकर (वय ७२) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजता गोळप येथील एका दुकानाच्या मागे घडली आहे. कामतेकर या रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून येऊन चोरट्याने त्यांचे दहा हजाराचे मंगळसूत्र हिसकावले आणि तो पळून गेला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.









