पावस:- मद्याच्या नशेत महिलेला शिवीगाळ व मारहाण करुन कोयतीने दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन चंद्रकांत पावसकर (३१) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास पर्शुराम नगर गोळप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची मावशी रहात असलेली जागा नावावर करुन देण्याच्या कारणावरुन संशयितांने मद्याच्या नशेत फिर्यादी यांच्या मावशीला लाथाबुक्यांनी मारहाण केली व कोयतीने दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.