रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा येथे घरकाम करणार्या महिलेने 51 हजार रुपयांची चोरी केल्याची फिर्याद पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री अशोक सोहनी (55, जोशी कंपाउंड, गोळप सडा) यांच्या घरामध्ये दोन महिला घर कामासाठी आहेत. वनिता रमाकांत घाणेकर (59), वैशाली संदीप घाणेकर (42, रा. संजीवनीनगर, गोळप) अशी घरकाम करणार्या महिलांची नावे आहेत. जयश्री सोहनी यांनी घरातील गोदरेजच्या कपाटात प्लास्टीकच्या डबीत मंगळसूत्र, अंगठी आणि कानातील रिंग यामध्ये ठेवले होते. त्या कपाटाची चावी त्यांनी आपल्या बटव्यात ठेवली होती. त्यांच्या बटव्यातील चावी घेवून कपाट ठेवलेले 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपये किंमतीचे कानातील रिंग असा एकूण 51 हजार रूपयांचा माल चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली. या तक्रारीत त्यांनी वरील वर्णनाचा माल हा घरकाम करणार्या वनिता घाणेकर या महिलेने चोरुन नेल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे.
त्यानुसार पोलिसांनी वनिता रमाकांत घाणेकर (59, गणेशनगर, गोळप) हिच्यावर भादविकलम 381 नुसार गुन्हा दाखल केला आहे.