गेल्या 24 तासांत 106 कोरोना पॉझिटीव्ह; 4 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर सातत्याने कोरोनाचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 106 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 961 वर पोहोचली आहे. तर आज जिल्ह्यात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 80 तर अँटिजेन टेस्ट केलेले 26 असे एकूण 106 नवे रुग्ण सापडले आहेत. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये गुहागर 6, चिपळूण 21, रत्नागिरीत 11 आणि लांजा तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत. तर अँटिजेन टेस्ट केलेल्यांमध्ये गुहागर 2, चिपळूण 4, संगमेश्वर 1, रत्नागिरीत 11 आणि लांजा तालुक्यातील 8 रुग्ण सापडले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाने आणखी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 149 वर जाऊन पोहचली आहे. खेड तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर चिपळूणात दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 149  वर जाऊन पोहोचली आहे.