गुहागर तालुक्यातून साडेसात लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रत्नागिरी:-गुहागर तालुक्यातील नरवण व बोऱ्या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत ७ लाख ४७ हजार ५६० रुपये किंमतीचा गोवा बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई रत्नागिरी ग्रामीण व भरारी पथक यांनी संयुक्तिक केली.

गुहागर तालुक्यातील नरवण व बोऱ्या परिसरात अवैध गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीवरून रत्नागिरी ग्रामीण व भरारी पथक कारवाईसाठी रवाना झाली. नरवण येथे टाकलेल्या धाडीत गोवा बनावट गोल्डन एस व्हास्कीच 25 बॉक्स , महाराष्ट्र बनावटीच्या मदयाचे 01 बॉक्स , 180 लि.गावठी दारू व एक नंबरप्लेट नसलेली स्विफ्ट डिझायर कार असा मिळून एकूण ६ लाख ८२ हजार रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई २९ जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास करण्यात आली . याप्रकरणी नितेश दिनेश आरेकर (वय ३२ वर्षे रा.नरवण ता.गुहागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नितेश दिनेश आरेकर याने गोवा बनावट मदयाचे काही बॉक्स घराचे बाजूस गोठयात तर गावठी दारू व काही बॉक्स स्विफ्ट डिझायर कार मध्ये ठेवले होते.

दुसरी कारवाई बोऱ्या परिसरात करण्यात आली. याठिकाणी गोल्डन एस व्होस्कीचे २ बॉक्स, मॅक्डॉल व्हिस्की, हायवर्डस व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण ६४ हजार ५८४ रू.किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर (वय ४२ वर्षे रा.कोंड कारूळ बो-या ता.गुहागर जि.रत्नागिरी) या संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ही कारवाई विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, प्र.अधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली  निरीक्षक शरद जाधव, दुययम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, स. दु. नि विजय हातीसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर , विशाल विचारे , महिला जवान अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव व दुययम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. याचपध्दतीने गोवा बनावट व गावठी दारूधंदयावर कारवाया सुरू राहतील असा इशारा प्र.अधिक्षक वैभव.व्ही.वैदय यांनी दिला आहे.