गुहागर:- गुहागर सडेजांभारी येथे शनिवार 27 ऑगस्ट रोजी एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. यानंतर रविवारी पीडित तरुणीने पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून संशयित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास कॉम्प्युटर क्लासवरून आपल्या घरी जात होती. यावेळी तरुणाने गाडीत विनयभंग केला होता. त्यानंतर गाडीतून उतरून घरी जात असताना हा तरुण ही मासू सडेजांभारी मिरगलवाडी स्टॉपवर उतरला. त्याने गाडीतून उतरून तिचा पाठलाग करत हात पकडुन मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. यानंतर तरुणीने तिथून पळ काढला. घडला प्रकार घरी सांगितल्यानंतर गुहागर पोलिस स्थानकात तरुणाविरोधात भादवी कलम 354, 354 ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मिरगल (राहणार सडेजांभारी, गवळीवाडी, गुहागर) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.