देवरुख:- गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअक गाडी देवरूख पोलीसांनी पकडली आहे. देवरूख कांजिवरा पर्शरामवाडी तिठा येथे मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी देवरूख पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोलेरो पिकअकमधून सहा गुरांची सिंधुदुर्गमधील कणकवली ते देवरूख अशी अवैधरित्या वाहतुक करण्यात येत होती. पोलीसांनी सहा गुरे व बोलेरो पिकअक असा मिळून ४ लाख ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख पोलीस ठाण्याचे पो. काँ. रोहित यादव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. यामध्ये अमित गुणाजी घाडीगावकर व सुरेश शांताराम गजबार (दोघेही रा. देवरूख बागवाडी) यांनी एकमेकांच्या संगनमताने दोन प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना असताना सहा जनावरांना दाटीवाटीने बांधून हौद्याच्या क्षमतेपेक्षा वाजवी भरून बोलेरो पिकअपमधून अवैधरित्या वाहतुक करताना देवरूख कांजिवरा पर्शरामवाडी तिठा येथे पोलीसांना गस्त घालतेवेळी आढळून आले.