गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयास्पद हालचाली ; संशयिताविरुद्ध गुन्हा

पावस:- तालुक्यातील गोळप ते रनपार रस्त्यावर संशयितरित्या हालचाली व स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या वृद्धा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबान हसन सारंग (वय ७८, रा. गोळप मोहल्ला, मुस्लीमवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) रात्री सव्वादहाच्या सुमारास गोळप ते रनपार जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या पुढील बाजूस निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्धाने तोंडास रुमाल बांधून कोळखात ओळख लपवून संशयास्पद हालचाली करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.