रत्नागिरी:- शहरातील गुढेवठार येथे रात्रीच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरणाऱ्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. वसीम नजीर सोलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ड) नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम हा २२ मार्च २०२४ रोजी गुढेवठार येथे रात्री ३.३० च्या सुमारास संशयास्पद हालचाल करत असल्याचे पोलिसांना आढळले. यावेळी त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तो कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर पोलिसांना देवू शकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी वसीम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.