गुंतवणुकीवर फायदा झाल्याचे भासवत खेडशीतील एकाला आठ लाखांचा चुना

रत्नागिरी:- एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून. त्यातील १० टक्के कमीशन आगावू मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक इन्व्हेस्टर महिलेने केली. या प्रकरणी इन्वेस्टर महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी यांच्या रहात्या घरी गांधी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे श्रीनगर खेडशी, रत्नागिरी येथे घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर भाऊ सकपाळ यांनी ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एसएमसी १२८ इन्व्हेस्टर स्ट्राटेजी अपडेट ग्रुप या ग्रुपच्या अडमीन संशयित महिला हिने तिच्या व्हॉटसॲप नंबर वरुन फिर्यादी सुधीर सकपाळ यांना कंपन्यांचे अप्पर सर्कीट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रेडींग, आयपीओ यांची माहिती देवून कंपन्यांचे शेअर ट्रेडीगबाबत सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बॅक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी बॅंक खात्यावरुन एनईएफटी तसेच युपीआय वरुन रक्कम ट्रान्स्फर करुन घेऊन सकपाळ यांना डाऊनलोड करण्यास सांगितले. एसएमसी ग्लोबल सेक्युरिज लिमिटेड या कंपनीचा लोगो असलेला अप्लीकेशन मध्ये सकपाळ यांनी केलेल्या रक्कमेवर त्यांना ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून ते प्रॉफिट फिर्यादी सकपाळ यांना परत देण्याकरिता संशयित महिलेने सकपाळ यांनी १० टक्के कमीशन आगावू मागवून सुधीर सकपाळ यांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ८ लाख ३ हजार ९६९ रुपये तसेच त्यावर फिर्यादी यांना झालेले प्रॉफिट फिर्यांदी यांना न देता सुधीर सकपाळ यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी सकपाळ यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.