रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे आंबेरे जुवळेवाडी येथे गावठी दारु बाळगणाऱ्या संशयितावर पुर्णगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. अरुणा अनंत गोळटकर (58, ऱा गावडे आंबेरे जुवळेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 10 लिटर गावठी दारु हस्तगत केली.
गावडे आंबेरे येथे गावठी दारुची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पुर्णगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 4 फेबुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी याच्या ताब्यात पोलिसांना 10 लिटर गावठी दारु आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी विकास याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला.









