रत्नागिरी:- येथील भंडारवाडी-गावखडी जेटीपासून ५० मिटर अंतरावर समुद्राच्या पाण्यात मृतावस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाबत पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
प्रमिला महादेव नागवेकर (७१, रा. गावखडी- भंडारवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८.३०च्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला गावखडी जेटीपासून ५० मीटर अंतरावर समुद्रात मृत स्थितीत आढळली. या प्रकरणी संजय सदाशिव पाटील (गावखडी भंडारवाडी) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात अंमलदार करत आहेत.









