पावस:- तालुक्यातील गावखडी ग्रामपंचातीच्या समोर विषय मिटवायचा होता तर मिटींग का घेतात असे भाष्य करणाऱ्याला नऊ जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सन्मुख तोडणकर, आकाश अशोक तोडणकर, अक्षय अशोक तोडणकर, अनिकेत अशोक तोडणकर, ऋतिक दिवाकर सुर्वे, निनाद प्रकाश पाटील, शुभंम दिगंबर पाटील, साईऱाज राजेश मयेकर व अर्जुन संतोष तोडणकर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहाच्या समोर अनिकेत मुड्ये जवळ गावखडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुगंध मधुकर पाटील (वय ४२) हे ग्रामपंचायत कार्यालयातून मिटींग संपवून लोक बाहेर येत असताना पाटील म्हणाले की, विषय मिटवायचा होता तर मिटींग का घेतात असे मोठ्याने बोलल्याचा राग संशयिताना आला व त्यांनी लाकडी स्टंप व बांबूने फिर्यादी सुंगध पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी पाटील यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.