पावस:- तालुक्यातील गावखडी भंडारवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ५८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजन राजाराम भोसले (४०) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) दुपारी गावखडी भंडारवाडी येथे मोकळ्या जागेत निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.