रत्नागिरी:- भडे (ता. लांजा) येथील गुरांच्या गोठ्यात साफसफाई व शेण काढण्यास गेलेल्या वृद्धेला गायीने पाठीमागून शिंग मारले. गंभीर दुखापत झालेल्या वृद्धे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
सरीता गोविंद लिंगायत (वय ६६, रा. भडे ता. लांजा) असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला गोठा झाडत असताना गोठ्यातील गायीने तिच्या पाठीमागून शिंग मारले. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









