रत्नागिरी:- गांजा बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी झालेल्या दोघा संशयित आरोपींची यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
निवखोल ते राजीवडा रस्त्यावरील एका शेडच्या पाठीमागे सलमान नाझीम पावसकर व जिब्रान बशीर भाटकर यांना गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी १२ जुलै २०२३ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता . यानंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती . त्यानंतर या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती . या प्रकरणी संशयित आरोपींच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी आरोपींच्यावतीने वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २ ऑगस्ट २०२३ रोजी जामीन मंजूर केला.